समुद्रपूर: वटसावित्रीच्या पावन पर्वावर गिरड येथील वार्ड क्रमांक २ मध्ये गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रमीच्या वतीने वटवृक्षाची लागवड
दिवसेंदिवस वाढते प्रदूषण व यापासून होणारे दुष्परिणाम यावर आळा घालण्यासाठी गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमी यांच्या पुढाकाराने गावात मिशन १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून आज शुक्रवारी २१ जुन रोजी सकाळी १० वाजता वटसावित्रीच्या पावन पर्वावर वार्ड क्रमांक २ मध्ये ठिकठिकाणी वटवृक्षाच्या रोपट्याच्याची लागवड करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई तेलरांधे, ग्रामपंचायत सदस्य वद्यै, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णू बाम्रणवाडे आदि उपस्थित होते.