समुद्रपूर: तळोदी येथे घरी आराम करीत असलेल्या इसमाला सर्पदंश: सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
समुद्रपुर तालुक्यातील तळोदी येथे १३ जुन रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंदू सोमाजी तांदुकर हे घरी आराम करीत असताना त्यांना सर्पदंश झाला यावेळी त्यांनी तातडीने उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असताना १७ जुन रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला यासंबंधी डॉक्टरांच्या मेडीकल रीपोर्ट वरुन यासंबंधी गिरड पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आल्याची माहिती १९ जुन रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली असून पुढील गिरड पोलीस करीत आहे.