समुद्रपूर: रासा येथे मगन संग्रहालयाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये बियाण्यास बीज प्रक्रियेविषयी जनजागृती;दाखविण्यात आले प्रात्यक्षिक
गिरड येथील मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्राच्या वतीने समन्वय गजानन गारघाटे यांच्या मार्गदर्शनात रासा येथे गुरुवारी २० जुनं रोजी सकाळी १० पेरणी पूर्व बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात आली असून शेतकऱ्यांत जनजागृती करण्यात आली आहे.बियाण्यांचे कीड रोगापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया महत्वाची आहे. शिवाय जिवाणूचे महत्व शेतकऱ्यांना कळावे. अधिकाधिक जैविक खतांचा आणि जिवाणूचा शेतात वापर करावा. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.