समुद्रपूर: शिवणी येथे वादळात घराच्या पळझळीची अतुल वांदिले यांच्याकडून पाहणी: शासनाकडे तातडीने मदतीची मागणी
समुद्रपूर तालुक्यातील शिवणी येथे १७ जुन रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गोर-गरीब घराचे छप्पर उडाले असून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. लोकांच्या घराचे छत्र उड्याल्याने व घरात पाणी शिरल्याने अन्न धान्य, तसेच या वादळी वाऱ्यामुळे मोठ-मोठे झाडे पडून गोरगरीब लोकांच्या घराचे प्रचंड मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे.१९ जुन रोजी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस 'अतुल वांदिले' यांनी तात्काळ मदतीची मागणी प्रशासनाकडे केली आहे.