नागपूर शहर: शहीद गोवारी उड्डाणपुलावर धावती दुचाकी जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सिताबर्डी येथील शहीद गोवारी उड्डाणपुलावर आज एका दुचाकीला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण आपली दुचाकी घेऊन शहीद गोवारी उड्डाणपुलावरून जात असताना अचानक गाडीतून धूर निघू लागला. प्रसंगावधान राखून चालकाने गाडी पुलाच्या कडेला उभी केली.