नागपूर शहर: धडाका: सायबर पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह ९ कर्मचारी निलंबित ; फसवणुकीच्या प्रकरणात मोठी कारवाई
सायबर पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यासह नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या या कडक निर्णयामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, निरीक्षक योगेश घारे,विजय राणे आणि कर्मचारी प्रफुल्ल ठाकरे,सतीश वाघ, श्रीकांत गोणेकर, सुशील चांगोले,अजय पवार व सौरभ हिवरकर यांचा समावेश आहे.