लातूर: लातूर ट्रॅफिकला ‘आरसीपी’ची साथ –४० जवानांचा अतिरिक्त तुकडीसह शिस्तीचा नवा प्रयत्न
Latur, Latur | Oct 8, 2025 लातूर: शहरातील वाढता वाहतुकीचा त्रास आणि बेशिस्त वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी लातूर पोलिसांनी मोठी पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेला अतिरिक्त ४० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ देण्यात येत असून, शिस्तीची अंमलबजावणी करण्यासाठी आरसीपी जवानांची तुकडीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.