जामगाव परिसरात सोमवारी (दि.८) दुपारी ३ वाजता अवैधरीत्या सुरू असलेल्या विनापरवानगी जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी विजय स्वरूपचंद गायकवाड (वय २८, रा. गंगापूर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात रात्री पोअं. अनिरुद्ध शिंदे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोह. विजय पाखरे करीत आहेत.