नागपूर शहर: नारी शक्ती वंदन विधेयक: भाजपकडून विरोधकांवर जोरदार निशाणा; महिलांना अधिकार नाकारल्याचा आरोप
नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी महिलांना त्यांच्या हक्कांपासून आणि आनंदापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप केला.