अमरावती: अपर आयुक्त संजय पवार यांचे आयएएस पदासाठी नामनिर्देशन
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त संजय पवार यांचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) पदासाठी नामनिर्देशन झाले. यानिमित्त आज १८ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी अपर आयुक्त संजय पवार यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. याप्रसंगी उपायुक्त गजेंद्र बावणे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते...