नागपूर शहर: नागपूर हादरले! जरीपटका परिसरात नाल्यात आढळला बोरीत बंद मृतदेह; परिसरात खळबळ
उपराजधानीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील एका नाल्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह बोरीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेह रक्ताने माखलेला असल्याने, कुणीतरी निर्दयीपणे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.माहिती मिळताच जरीपटका पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.