जालना: आयशरसह 31.60 लाखांचा गुटखा जप्त; शकील पठाणवर गुन्हा, मूळ साखळी उघड करण्याची मागणी
Jalna, Jalna | Apr 1, 2026 जालना शहरात गुटखा तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत आयटीआय परिसरात मंगळवारी रात्री उशिरा आयशर वाहन (क्र. एमएच 07 पी 2837) मधून तब्बल 21 लाख 60 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. तसेच संबंधित आयशर वाहनाची अंदाजे 10 लाख रुपये किंमत धरून एकूण 31 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बुधवार दि. 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषधी प्रशासनाला या बाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शकील पठाण याला ताब्यात घेण्यात आले.