तुमसर: देवसर्रा येथे एका घरात धाडसी चोरी, १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
तुमसर तालुक्यातील देवसर्रा येथे अज्ञात आरोपींनी एका घरात धाडसी चोरी करून 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. 22 सप्टेंबर रोज सोमवारला सायं.5 वा.च्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी नशीर श्याममोहम्मद शेख असे घर मालकाचे नाव असून तो आपल्या कुटुंबीयांसह सीतासावंगी येथे गेला असता अज्ञात आरोपींनी त्याच्या घरातील नगदी 75 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला