मांजरा प्रकल्प धनेगाव येथून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रातील वाढत्या येव्यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. 16/11/2025 रोजी सायं. 6.00 वाजता गेट क्रमांक 1 आणि 6 उचलण्यात आले आहेत.