कडेगाव तालुक्यातील नांदणी उपनदीतील वाळू उपशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मंजुरी विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आणि शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज 17 डिसेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निर्देशन करण्यात आले. हरित लवादाची बंदी असतानाही शिवनी वांगी हद्दीतील नांदणी उपनदीत वाळू उपसा मंजुरी देण्यात आल्याचा दावा करत गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले . मात्र कोणताही ठोस निर्णय न मिळाल्याने आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने येत्या चार दिवसात निर्णय न घेतल्यास सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.