रामटेक: विस्कळीत एलपीजी गॅस पुरवठ्यानंतर आता पेट्रोल पंपावर रामटेकरांच्या रांगा
Ramtek, Nagpur | Mar 19, 2026 आखाती युद्धाचा प्रभाव भारतातील गाव खेड्यातपर्यंत पोहोचला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच- सहा दिवसानंतरच रामटेक तालुक्यातील स्वयंपाकाचा गॅस एलपीजीची सेवा विस्कळीत झाली. पर्यायाने गॅस ग्राहक पेनिक होऊन गॅस एजन्सी समोर रांगेत उभा झाला. आता गुरुवार दिनांक 19 मार्चला सकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल साठी गर्दी करणे सुरू केले आहे. काही पेट्रोल पंपावर विक्री सुरळीत सुरू असून काही पेट्रोल पंप ठप्प झाले आहेत.