मोर्शी: मोर्शी शहरातील आठवडी बाजार परिसरात मिळाला वृद्ध इसमाचा मृतदेह, मृतकाची ओळख पटली
मोर्शी शहरातील आठवडी बाजार परिसरात दिनांक 14 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता एका 65 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला असून, मोर्शी पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतकाची ओळख पटवण्यात आली आहे. मधुकर जाणे वय 65 वर्षे राहणार बेलोरा असे मृतकाचे नाव असून, मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आला आहे. व्यसनाधीनतेमुळे मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे