नागपूर शहर: 'कोणाचा डाऊनफॉल होईल हे वेळच सांगेल'; नाना पटोलेंचे पार्थ पवार आणि संजय राऊतांना प्रत्युत्तर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते पार्थ पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. "कोणाचा डाऊनफॉल होईल हे वेळच सांगेल," असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.