नागपूर शहर: नागपुरात कॅफेमधून ४५ हजारांची रोकड लंपास; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
27 मे ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमाल चौक भागात असलेल्या 'कॅफे रूफ बार अँड रेस्टॉरंट'मध्ये एक खळबळजनक चोरीची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास एका तरुण आणि तरुणीने कॅफेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तेथील ४५,००0 रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. ही संपूर्ण घटना कॅफेमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाचपावली पोलीस आरोपी तरुण-तरुणीचा शोध घेत आहेत.