शहरातील बसस्थानक, सुभाष रोड, साठे चौक येथे राबविण्यात आली अतिक्रमण हटाव मोहीम
Beed, Beed | Oct 18, 2024 बीड शहरातील, बसस्थानक, सुभाष रॉड,साठे चौक, डीपी रोड, अंबिका चौक, राजीव गांधी रोड, येथे शुक्रवार दि.18 ऑक्टोबर रोजी, सकाळी 11 वाजता, अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. सदरील मोहीम, बीड नगर परिषद, आणि बीड वाहतूक शाखा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पीएसआय वासुदेव मिसाळ, अंमलदार दत्ता उबाळे, नितीन शिंदे, बाळू नागरगोजे, नारायण दराडे, नितीन काकडे, संतोष हांगे, यांचा सहभाग होता.