इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरात रात्री अवैध हालचालींची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने दाखवलेल्या तत्परतेने गंभीर गुन्हा टळला. संशयित हालचाली करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त करून योगेश गिरम याला ताब्यात घेण्यात आले व त्याचा दुसरा साथीदार सचिन मिसाळ पळून गेला. या प्रकरणी दोघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.