नागपूर शहर: कोतवालीतील सौरभ घाटे हल्ला प्रकरण: दोघांना अटक, दोघांचा शोध सुरू : पोलीस उपायुक्त राहुल मदने
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 4 जूनला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सौरभ घाटे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात योगेश गुप्ता आणि बावनकर या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे