नागपूर शहर: मातोश्री नगर येथे एस आर पी एफ जवानाची हत्या, साळा गंभीर जखमी : पुरुषोत्तम देवकर पोलीस निरीक्षक
3 एप्रिल ला दुपारी 05:30 ने पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्री नगर परिसरात एक अत्यंत थरारक आणि संतापजनक घटना घडली आहे. आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारणे एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाला महागात पडले. आरोपीने आपल्या साथीदारांसह मिळून जवान पंकज ठाकूर यांची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात जवानाचा सालादेखील गंभीर जखमी झाला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर यांनी दिली आहे.