भडगाव: भडगाव तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले, सर्वत्र पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत,
जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरास तालुक्यात आज दिनांक 22सप्टेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पासून सकाळपर्यत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला, यात भडगाव शहरातील आदर्श कन्या शाळेजवळ असणाऱ्या कोल्हा नाल्याला पाणी आले, कन्या शाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीत पाणी अडकल्याने शाळेच्या परिसरात पाणी साचले,, संरक्षण भिंत जेसीबीने तोडून त्या पाण्याची निघण्याची व्यवस्था करण्यात आली, श्रीराम मंगल कार्यालय जवळील रस्त्याच्या दुतर्फा पाणी निघण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती.