लातूर: धनेगाव मांजरा धरणातील विसर्ग वाढला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर -मांजरा प्रकल्प प्रशासनाने धरणातील वाढती आवक लक्षात घेता आज रविवार, दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गेट क्रमांक 1 व 6 (एकूण दोन गेट) उचलले आहेत. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून 0.25 मीटर उंचीवरून पाणी सोडले जात असून, मांजरा नदीपात्रात 1747.14 क्युसेक्स (49.48 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू झाल्याची माहिती पुरनियंत्रण कक्षाने दिली आहे.