मुंबई उपनगर: निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या विरोधकांवर आशिष शेलारांचा ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ टोला
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि एसआयआरविरोधातील विरोधकांच्या मोर्चाला ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ म्हणत जोरदार टोला लगावला. निवडणूक निकालांवरून पक्षपातीपणाचा आरोप तथ्यहीन असल्याचं त्यांनी सांगितलं.