सेनगाव: तालुक्यातील पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत जाहीर,कही खुशी कही गम अवस्था, अनेकांच्या स्वप्नावर पाणी
सेनगांव पंचायत समितीच्या 20 गणाचे आरक्षण सोडत आज दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी जाहीर झाले असून या आरक्षण सोडतीमुळे काही गम काही खुशी अशी अवस्था निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार असून त्या अनुषंगाने आज पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत जाहीर झाले. यामध्ये सेनगांव तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या व बहुचर्चित असलेल्या आजेगांव,गोरेगांव,पानकनेरगांव पुसेगांव येथील गणाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.