महागाव: लतालुक्यातील फुलसावंगी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कयाम नवाब यांची बिनविरोध निवड
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कयाम नवाब यांची आज दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे आणि गावातील अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असलेले कयाम नवाब यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक वर्गाने त्यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.