पनवेल: पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती
Panvel, Raigad | Oct 18, 2025 पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वासुदेव बळवंत फडके इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे ‘अमृत दुर्गोत्सव’ मोठ्या उत्साहात आज शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती परंपरेला अभिवादन म्हणून शाळेत दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांना १२ गटांमध्ये विभागून विविध ऐतिहासिक दुर्गांची प्रतिकृती साकारण्यास प्रवृत्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रायगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांचे हुबेहूब वास्तू साकारून शिवकालीन वास्तुकलेचा आणि इतिहासाचा भव्यतेने आविष्कार केला. या स्पर्धेचे परीक्षण नामवंत इतिहास अभ्यासक आणि मोडी लिपी संशोधक पंकज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.