नागपूर शहर: नागपुरात चोरट्यांचा उच्छाद; एकाच रात्री चार दुकाने फोडली, आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद
9 मेला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आय.सी. चौक परिसरात चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला. या बेधडक चोरट्यांनी एका ज्वेलरी शॉपसह एकूण चार दुकानांचे शटर तोडून सुमारे ४२ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. एकाच रात्री घडलेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून आल्या. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवा