नागपूर शहर: आश्रमशाळांमध्ये १५ जूनपासून शैक्षणिक सत्राचा शुभारंभ; अशोक उईके, आदिवासी विकास विभाग
राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये आगामी १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला उत्साहात सुरुवात होणार आहे. राज्यातील एकूण ३५० आश्रमशाळांमध्ये पहिल्याच दिवशी 'प्रवेशोत्सव' साजरा करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.