अर्धापूर: अर्धापूर तालुक्यातील चनापुर तांडा येथे 60 ते 70 गावकऱ्यांना विषबाधा
आज दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 च्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील चनापुर तांडा येथे 60 ते 70 जणांना विषबाधा झाली चनापुर तांडा येथे आरोग्य अधिकारी डॉक्टरांची टीम दाखल झाली असून काल रात्रीपासूनच रुग्णांना उलटी संडास मळमळ असा त्रास होत होता विषबाधा झालेल्या रुग्णावर उपचार सुरू ही विषबाधा गावामध्ये स्वच्छता नसल्यामुळे व पिण्याच्या पाण्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. विषबाधेचे कारण अद्यापही पष्ट नाही आमदार श्रीजया चव्हाण यांनी चनापूर येथे भेट देऊन माहिती दिली