नागपूर शहर: नागपूर विधान परिषद पोटनिवडणूक: ९८.४४ टक्के मतदान; २२ जूनला निकाल, निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. एकूण ८३६ मतदारांपैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत आहे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.