समुद्रपूर: कोरा येथे गिरड पोलिसांची अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई, देशी दारूने भरल्या ५० बाटल्या जप्त
समुद्रपुर तालुक्यातील गिरड पोलीसांनी कोरा येथे अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करीत देशी दारूने भरल्या ९० मिलीच्या ५० शिश्या जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड यांना कोरा येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी पाठवून अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करीत देशी दारूने भरल्या ९० मिलीच्या ५० शिश्या किमंत ३ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.