कर्जत: कर्जत शहरासाठी दिलासादायक पाऊल, रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न
Karjat, Raigad | Oct 1, 2025 कर्जत शहरातील प्रति पंढरपूर आळंदी ते कर्जत फायर ब्रिगेड पर्यंतचा रस्ता दीर्घकाळापासून खड्डेमय झाल्याने वाहन चालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली असून त्यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीए फंडातून निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे. या निधीतून संबंधित रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून आज बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडला.