दिग्रस तालुक्यातील निंभा शेतशिवारात ५ डिसेंबर रोजी मनिषा श्रीकांत गव्हाणे वय-२८ वर्ष या चार महिन्याच्या गर्भवती विवाहितेने विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी फिर्यादी शेषराव तपासे यांनी दिग्रस पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, शारीरिक व मानसिक छळ, सततचे वाद, तसेच हुंड्याची मागणी यामुळे मनिषाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांमध्ये पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.