नाशिक: जेलरोड भागात पवारवाडी रुळावर अज्ञात दोन प्रेमी युगलाचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ; अधिक माहितीसाठी पोलिसांचे आवाहन
Nashik, Nashik | Sep 14, 2025 नाशिकरोड परिसरात अज्ञात प्रेमी युगलाने मुंबई-हावडा एक्सप्रेस समोर येत आत्महत्या केल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून दुपारी चार वाजता नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या दरम्यान जेलरोड पवारवाडीच्या पुढे एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ घडली. नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.