कल्याण: कल्याण मध्ये ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते ढोल ताशे वाजवत दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कडे रवाना
Kalyan, Thane | Oct 2, 2025 आज दसऱ्यानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्क येथे भव्य असा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाल शिवाजी पार्क कडे जात आहेत. कल्याण मधून देखील ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते ढोल ताशे वाजवत शिवाजी पार्क कडे रवाना झाले आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत म्हणून विरोधकांना धडकी भरली आहे. मात्र दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही काळाची गरज होती अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे.