नागपूर शहर: नागपूर हादरले: हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतून अपहरण झालेल्या अथर्वचा खून; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
हनुमान जयंतीच्या उत्सवाचा आनंद सुरू असतानाच शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २ एप्रिल रोजी रात्री शोभायात्रेतून अपहरण करण्यात आलेल्या अथर्व नानोरे या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली असून, आज त्याच्यावर जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमांनी अथर्वचे अपहरण केले होते.