नागपूर शहर: जलसंवाद परिषदेत प्रकल्पग्रस्तांचा राडा; आजच्या कार्यक्रमात पोलिसांचा कडक पहारा, फलक अन् कागदही जप्त
नागपुरात आयोजित 'जलसंवाद परिषदे'त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असताना गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे रविवारी मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर, आज होणाऱ्या 'जल क्रांती परिषदे'त पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलली असून, सुरक्षेच्या कारणास्तव उपस्थितांकडील कागदपत्रे आणि फलक ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.