मोर्शी: ममदापूर नटाळा झोलंबा गट ग्रामपंचायतच्या वतीने झोलंबा येथे रक्तदान शिबीर संपन्न, 61 रक्तदात्यांनी केले रक्तदान
गट ग्रामपंचायत ममदापूर नटाळा झोलंबा त्यांचे वतीने झोलंबा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून एकूण 69 त्यांनी रक्तदान केल्याची माहिती आज दिनांक 16 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता प्राप्त झाली आहे. महात्मा फुले ब्लड डोनर ग्रुप अमरावतीचे महाराष्ट्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोडे या रक्तदान शिबिराला उपस्थित असल्याचे कळते. सामान्य रुग्णालय अमरावती रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर वाघमारे, योगेश पानझडे मिलिंद तायडे तथा गट ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते