नागपूर शहर: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणारा नराधम गजाआड : हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 22 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या ३९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश कुमार नेवरराम पटेल असे या आरोपीचे नाव आहे.याबद्दलची अधिक माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.