नागपूर शहर: डीप्टी सिग्नल जवळील मसाल्याच्या गोडाऊन मध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद
पोलीस ठाणे कळमना हद्दीतील डिप्टी सिग्नल जवळील मसाल्याच्या गोडाऊनमध्ये अज्ञात तीन चोरट्यांनी प्रवेश करून नऊ लाख 55 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. हे चोरटे गोडाऊन मध्येच लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. या कॅमेरा मध्ये तीन चोरटे दिसून येत आहे. या चोरट्यांनी गोडाऊनच्या भिंतीची टिन काढून गोडाऊन मध्ये प्रवेश केला आणि रोख रक्कम चोरून आरोपी पसार झाले दरम्यान शातीर चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेरा दिसला असतात तो कॅमेरा त्या चोरट्यांनी विरुद्ध दिशेला फिरविला.