मुर्तीजापूर: माना पोलीस स्टेशनच्या परिसरात "हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र"अभियानांतर्गत ५०० वृक्षांची लागवड
माना पोलीस स्टेशनच्या परिसरात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत ५०० वृक्षांची लागवड मंगळवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली त्यामध्ये कडुलिंब १७५, सिसम १००, चिंच १००आणि कडूबदाम १२५ अशा विविध प्रजातींचा समावेश होता वृक्षारोपणानंतर अमृत वृक्ष ॲपद्वारे सर्व वृक्षांचे जिओ टॅगिंग करून माहिती नोंदविली ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वात वृक्ष लागवडीसाठी माना पोलीस स्टेशनचे अधिकारी,पोलीस अंमलदार ,होमगार्ड माना येथील शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला