जालना: अंत्यविधी यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखला!
Jalna, Jalna | Sep 7, 2026 जालना : बदनापूर तालुक्यातील मौजे ढोगसाळ येथे अंत्यसंस्काराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. या प्रश्नावर गावकऱ्यांनी २ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आज ७ सप्टेंबर रोजी अंत्यविधी यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी ही यात्रा रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ढोगसाळ येथील स्मशानभूमीच्या जागेच्या मालकीवरून हा वाद निर्