जालना: नवकल्पना, उद्योगसंधी आणि युवा अभियंत्यांच्या भविष्यावर मंथन; रोटरी क्लब ऑफ जालना एलिटतर्फे अभियांत्रिकी दिन उत्साहात
Jalna, Jalna | Sep 27, 2026 अभियांत्रिकी क्षेत्रातील नव्या संकल्पना, उद्योगक्षेत्रातील बदलत्या संधी आणि युवा अभियंत्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा विशेष कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ जालना एलिटतर्फे आयसीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, जालना येथे उत्साहात पार पडला. रविवार दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आजची नवकल्पना, उद्याचे उज्ज्वल भविष्य या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अभियंते, विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.