नागपूर शहर: हुडकेश्वर पोलीस ठाण्यात समस्या निवारण शिबिराचे आयोजन
5 जुलैला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आज पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या उपस्थितीत समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांसमोर आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.