श्रीवर्धन: खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते बोर्ली पंचतन येथील अखंड बुरुड समाज मंदिराच्या नुतन वास्तुचे उद्घाटन
रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील अखंड बुरुड समाज मंदिराच्या नुतन वास्तुचे उद्घाटन आज रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले. ह्या कार्यक्रमाप्रसंगी बुरुड समाज, स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना, “मला आणि आदितीला श्रीवर्धनकरांनी वारंवार सेवा करायची संधी दिल्याबद्दल मी श्रीवर्धनकरांचे आभार मानतो. समाज सभागृहाचा उपयोग हा चालता बोलता असायला पाहिजे.