अलिबाग: देशात जात, पात, धर्माच्या नावाने फूट पाडण्याचा प्रकार सुरू
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची घणाघाती टीक
Alibag, Raigad | Oct 9, 2025 देशात सध्या जात, पात, धर्माच्या नावाने फूट पाडण्याचा प्रकार सुरू आहे. जात धर्मासाठी भांडा हा विचार सरकारने डोक्यात टाकला आहे. धर्माच्या नावाने तुमच्या हाती सत्ता येईल, मात्र त्याने जनतेचे भले होणार आहे का? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुवारी अलिबागमध्ये उपस्थित केला. तसेच जातीच्या राजकारणातून बाहेर पडून हक्काची लढाई लढली पाहिजे, असे आवाहन बच्चू कडू यांनी जनतेला केले. राज्यात हक्क यात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बच्चू कडू अलिबागमध्ये आले.