नागपूर शहर: कर्मचाऱ्यांकडून पावती फाडल्याने राडा; ट्रॅफिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, बघा वायरल विडिओ
शहरात वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्यातील वाद नवीन नाहीत, मात्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने नागपूर ट्रॅफिक पोलिसांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक आणि ट्रॅफिक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. संबंधित नागरिकाचा आरोप आहे की, त्याचे चलन (पावती) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने नाही, तर टोइंग व्हॅनवरील खाजगी कर्मचाऱ्यांनी फाडले आहे.